#लोकसभा निवडणूक- 2024 #LOKSABHA GENERAL ELECTIONS-2024
लोकसभा निवडणूक- 2024
#आचारसंहिता
नमस्कार मित्रांनो. सध्या लोकसभेच्या निवडणुकीचे दिवस आहेत आणि लोकसभेची आचारसंहिता लागू झालेली आहे .मित्रांनो आचारसंहितेचा काळ हा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अतिशय सावधगिरी बाळगण्याचा काय असतो. आपल्या आसपासचे अनेक लोक राजकारणाबद्दल च्या त्याच्या गप्पागोष्टी करत असतात तेव्हा आपण त्यांच्यामध्ये त्या चर्चेमध्ये सहभागी होत असतो आणि या चर्चेत सहभागी होत असताना मतमतांतरे आपल्या कानी पडत असतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रतिनिधी बद्दल, लोकांची वेगवेगळी मते आपल्याला ऐकायला मिळत असतात. तेव्हा त्या लोकप्रतिनिधी बद्दल आपल्याही मनामध्ये एक विशिष्ट प्रकारची प्रतिमा तयार होत असते. आणि ही प्रतिमा कळत नकळत वागण्यातून आणि बोलण्यातून देखील व्यक्त होत असते. कारण आपणही एक व्यक्तीच असतो. आणि आपण पाहतो की, आजचे युग हे सोशल मीडिया चे युग आहे.
सोशल मीडिया वरती कोणतीही गोष्ट लपून किंवा झाकून राहत नाही आणि कोणत्याही गोष्टीचा आणि प्रसार व्हायला काहीच वेळ लागत नाही. अगदी काही क्षणांमध्ये सर्व गोष्टी जगभर पसरू शकतात. आणि म्हणून भारतीय कर्मचाऱ्यांसाठी संहितेचा हा कालावधी म्हणजे तारेवरची कसरतच असते, नाही का?
आणि म्हणून मित्रांनो या कालावधीमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाचा वापर करताना खूप काळजी घेणे गरजेचे आहे. या काळजी घेण्याच्या बाबतीमध्ये देखील विविध मेसेज सर्वत्र फिरत असतात, परंतु आपण ते वाचतो, गांभीर्याने न घेता सोडून देतो. परंतु सोशल मीडिया जेव्हा आपण हाताळत असतो, तेव्हा आपण खूप काळजी घेणे गरजेचे असते. अन्यथा आपण जर भावनेच्या आहारी गेलो आणि नकळत आपल्या मार्फत सोशल मीडिया वरती जर काही राजकीय पोस्ट गेली , की ज्या पोस्ट द्वारे आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ शकतो, असं एखादं लिखाण किंवा पोस्ट जर आपल्या मार्फत तर आपण नक्कीच आदर्श आचारसंहितेचा असा त्याचा अर्थ होतो.
म्हणून सोशल मीडिया आचारसंहितेच्या कालावधीमध्ये वापरत आपण काळजीपूर्वक वापरायला हवा गोष्टींची काळजी घ्यायला हवी. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे या आचारसंहितेचा ठरलेले नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत, कार्यरत असलेले कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा वर्तणूक नियम1967 मधील कलम3 व 4 चा भंग केल्यामुळे निलंबनाची कारवाई झालेली आहे. या कारवाईचा आदेश दिनांक 28 मार्च 2024 या दिनांकाचा निलंबनाचा आदेश सध्या सर्वत्र सोशल मीडियावर फिरत आहे. म्हणून सर्व शासकीय बंधू-भगिनींनी आचारसंहितेच्या काळामध्ये सोशल मीडियाचा वापर करताना अत्यंत काळजीपूर्वक करावा असे आपणा सर्वांना आवाहन करण्यात येत आहे. धन्यवाद…. यासंबंधीचे निलंबनाचे आदेश.
नमस्कार मित्रांनो सध्या लोकसभेच्या निवडणुकीचे दिवस आहेत आणि लोकसभेची आचारसंहिता लागू झालेली आहे मित्रांनो आचारसंहितेचा काळ हा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अतिशय सावधगिरी बाळगण्याचा काय असतो आपल्या आसपासचे अनेक लोक राजकारणाबद्दल च्या त्याच्या गप्पागोष्टी करत असतात तेव्हा आपण त्यांच्यामध्ये त्या चर्चेमध्ये सहभागी होत असतो आणि या चर्चेत सहभागी होत असताना मतमतांतरे आपल्या कानी पडत असतात त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रतिनिधी बद्दल, लोकांची वेगवेगळी मते आपल्याला ऐकायला मिळत असतात. तेव्हा त्या लोकप्रतिनिधी बद्दल आपल्याही मनामध्ये एक विशिष्ट प्रकारची प्रतिमा तयार होत असते. आणि ही प्रतिमा कळत नकळत वागण्यातून आणि बोलण्यातून देखील व्यक्त होत असते. कारण आपणही एक व्यक्तीच असतो. आणि आपण पाहतो की, आजचे युग हे सोशल मीडिया चे युग आहे. सोशल मीडिया वरती कोणतीही गोष्ट लपून किंवा झाकून राहत नाही आणि कोणत्याही गोष्टीचा आणि प्रसार व्हायला काहीच वेळ लागत नाही. अगदी काही क्षणांमध्ये सर्व गोष्टी जगभर पसरू शकतात. आणि म्हणून भारतीय कर्मचाऱ्यांसाठी संहितेचा हा कालावधी म्हणजे तारेवरची कसरतच असते, नाही का?
आणि म्हणून मित्रांनो या कालावधीमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाचा वापर करताना खूप काळजी घेणे गरजेचे आहे. या काळजी घेण्याच्या बाबतीमध्ये देखील विविध मेसेज सर्वत्र फिरत असतात, परंतु आपण ते वाचतो, गांभीर्याने न घेता सोडून देतो. परंतु सोशल मीडिया जेव्हा आपण हाताळत असतो, तेव्हा आपण खूप काळजी घेणे गरजेचे असते. अन्यथा आपण जर भावनेच्या आहारी गेलो आणि नकळत आपल्या मार्फत सोशल मीडिया वरती जर काही राजकीय पोस्ट गेली , की ज्या पोस्ट द्वारे आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ शकतो, असं एखादं लिखाण किंवा पोस्ट जर आपल्या मार्फत तर आपण नक्कीच आदर्श आचारसंहितेचा असा त्याचा अर्थ होतो.
म्हणून सोशल मीडिया आचारसंहितेच्या कालावधीमध्ये वापरत आपण काळजीपूर्वक वापरायला हवा गोष्टींची काळजी घ्यायला हवी. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे या आचारसंहितेचा ठरलेले नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत, कार्यरत असलेले कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा वर्तणूक नियम1967 मधील कलम3 व 4 चा भंग केल्यामुळे निलंबनाची कारवाई झालेली आहे. या कारवाईचा आदेश दिनांक 28 मार्च 2024 या दिनांकाचा निलंबनाचा आदेश सध्या सर्वत्र सोशल मीडियावर फिरत आहे. म्हणून सर्व शासकीय बंधू-भगिनींनी आचारसंहितेच्या काळामध्ये सोशल मीडियाचा वापर करताना अत्यंत काळजीपूर्वक करावा असे आपणा सर्वांना आवाहन करण्यात येत आहे. धन्यवाद…. यासंबंधीचे निलंबनाचे आदेश……
@ शासकीय कर्मचाऱ्यांनी आचारसंहितेच्या काळात खालील काळजी घ्यावी@
1. कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू घेऊ नये.
2. कोणत्याही राजकीय पक्षांच्या चिन्हांचा वापर कुठेही करू नये.
3. कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रचारास वाव मिळेल अशी बाब आचरणात आणू नये.
4. कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा कर्मचाऱ्यांनी हाती घेऊ नये.
5. कोणत्याही राजकीय पक्षाच्या सभेला, प्रचाराला शासकीय कर्मचाऱ्यांनी हजेरी लावू नये.
6. कोणत्याही राजकीय पक्षाच्या जाहीरनामा ला कोणत्याही प्रकारे प्रसिद्धी देऊ नये.
7. कोणत्याही राजकीय पक्षावर, पुढाऱ्याला टीका करू नये.
8. कोणत्याही राजकीय पक्षाचे किंवा नेत्यांचे गुणगान किंवा त्यांच्या कामाला आचारसंहितेच्या काळात प्रसिद्धी देऊ नये.
9. कर्मचाऱ्याने राजकीयदृष्ट्या तटस्थ राहावे.
10. शासकीय कर्मचाऱ्यांनी शासनाला कामकाज पार पाडण्यासाठी, त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाला संपूर्ण प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य व्यवस्थित करावे.