#तयारी शिष्यवृत्ती परीक्षेची

विविध शालेय स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा
             School Level Competative E. तयारी शिष्यवृत्ती परीक्षेची

. स्कॉलरशिप परीक्षा पूर्वतयारी व्याकरण व्हिडिओhttps://youtu.be/6neLe8GxtHg

#तयारी शिष्यवृत्ती परीक्षेची

ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी खाली लिंक ला क्लिक करा.https://forms.gle/x3ERSf79P9JvPHtq8


     #तयारी शिष्यवृत्ती परीक्षेची, विविध शालेय स्पर्धा परीक्षा :-

#CompetativeExams

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नुकताच इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर झालेला आहे. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व गुरुजन वर्गाचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा.
           मित्रांनो शालेय जीवनामध्ये इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा,एम टी एस जळगाव, जी टी एस, मंथन, जूनियर आयएएस वगैरे भरपूर स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते.
         या स्पर्धा परीक्षा विविध वर्गांसाठी विविध स्पर्धा परीक्षा आयोजित केलेल्या असतात. जसे की, इयत्ता पाचवी साठी व इयत्ता आठवीसाठी शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित केल्या जातात. त्याचप्रमाणे इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी एन एम एम एस ही परीक्षा देखील परीक्षा परिषदेमार्फत आयोजित केली जाते.
         ह्या झाल्या शासकीय शालेय स्पर्धा परीक्षा. परंतु याच्या व्यतिरिक्त इतर वर्गासाठी देखील वेगवेगळ्या शालेय स्पर्धा परीक्षांचे आयोजन वेगवेगळ्या खाजगी स्पर्धा परीक्षा संस्था मार्फत केले जाते.
             शालेय स्पर्धा परीक्षा नवोदय पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक कराhttps://youtube.com/live/k1u45CrD2To?feature=share
          अशा सर्व स्पर्धा परीक्षांना बसवण्याची पालकांची देखील खूप इच्छा असते. आणि विद्यार्थ्यांची देखील इच्छा असते. परंतु बऱ्याच वेळा पालकांना या परीक्षेच्या संदर्भामध्ये माहिती वेळेमध्ये उपलब्ध होत नाही. आणि बऱ्याच वेळेस विद्यार्थी आणि पालकांकडून ती संधी निघून जाते आणि त्यांना उशिरा माहिती मिळते. म्हणून विद्यार्थी अशा स्पर्धा परीक्षांपासून वंचित राहतात.
            विविध शालेय स्पर्धा परीक्षा, #तयारी शिष्यवृत्ती परीक्षेची
             School Level Competative Exams
           इयत्ता पहिली पासून खाजगी संस्था मार्फत घेण्यात येणाऱ्या शालेय स्पर्धा परीक्षा आयोजित केल्या जातात. अशा वेगवेगळ्या शालेय स्पर्धा परीक्षा बद्दलची माहिती आपण या लेखांमध्ये घेणार आहोत.
         #तयारी शिष्यवृत्ती परीक्षेची स्पर्धा परीक्षांसाठी सामान्य ज्ञानावर आधारित व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक कराhttps://youtu.be/d-uVALCu6wo

तयारी शिष्यवृत्ती परीक्षेची – शालेय जीवनातील महत्त्व

  खालील विविध शालेय स्पर्धा परीक्षा, वेगवेगळ्या खाजगी संस्थामार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर घेतल्या जातात.

  1. एम. टी. एस. जळगाव
  2. मंथन
  3. जि. टी. एस.
  4. ज्यू. आय. ए. स.
  5. 5.बी. टी. एस.
              या व अन्य अशा प्रकारच्या विविध शालेय स्पर्धा परीक्षा इयत्ता पहिलीपासून प्राथमिक स्तरावर घेतल्या जातात.
         शालेय स्पर्धा परीक्षांचे महत्त्व
         Importance of School Level Competative Exams
  6. अनुभव:-
                      #तयारी शिष्यवृत्ती परीक्षेची :-अशा प्रकारच्या शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीपासूनच स्पर्धा परीक्षांचा अनुभव येतो. त्यामुळे जेव्हा विद्यार्थी महत्त्वाच्या टप्प्यावरील स्पर्धा परीक्षांना सामोरे जातात जसे की इयत्ता पाचवी ची स्कॉलरशिप परीक्षा असेल किंवा इयत्ता पाचवी ची नवोदय प्रवेश पात्र परीक्षा असेल, अशा परीक्षांना सामोरे जाताना विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही. वरील प्रकारच्या आता पहिलीपासूनच्या परीक्षा दिल्यामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचा स्पर्धा परीक्षांचा अनुभव येतो.#तयारी शिष्यवृत्ती परीक्षेची
  7. भीती नाहीशी होते :-
                 #तयारी शिष्यवृत्ती परीक्षेची:- इयत्ता पहिलीच्या वर्गासारख्या बालवयापासूनच या परीक्षेला सामोरे गेल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षा बद्दल अजिबात भीती राहत नाही. दरवर्षी पुढल्या वर्गाची अशा प्रकारची स्पर्धा परीक्षा दिल्यामुळे स्पर्धा परीक्षे बद्दल त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो व भीती पूर्णपणे नष्ट होऊन जाते.#तयारी शिष्यवृत्ती परीक्षेची
  8. गुणवत्ता वाढते :-
                    इयत्ता पहिलीपासूनच अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना सामोरे गेल्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता खूप चांगल्या प्रकारे वाढते. कारण जर विद्यार्थी अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना बसलेले नसतील तर त्यांना शिकवणारे शिक्षक किंवा पालक देखील विद्यार्थ्यांना त्यांच्या पाठ्यपुस्तकांमधील पाठ उतारा व त्यावरील प्रश्न उत्तरे आणि थोडेफार पाठांतर इथपर्यंतच अभ्यास मर्यादित ठेवतात किंवा त्यांचा अभ्यास इथपर्यंतच मर्यादेमध्ये राहतो.
                  #तयारी शिष्यवृत्ती परीक्षेची
  9. परंतु विद्यार्थी जर शालेय स्पर्धा परीक्षांना सामोरे जात असतील तर त्या दृष्टीने त्यांचा सर्वांगीण अभ्यास होत असतो. त्यामध्ये व्याकरण, शब्द संग्रह, वाक्प्रचार म्हणी, समाज पूर्वक आकलन, वाचन, वाक्यात उपयोग करणे, शब्दांचा, म्हणींचा, वाक्प्रचारांचा अर्थ सांगणे इत्यादी प्रकारचा सविस्तर अभ्यास विद्यार्थ्यांचा होत असतो.
  10. आत्मविश्वास वाढतो :-
                    अशाप्रकारे वरील मुद्दा क्रमांक तीन मध्ये आपण बघितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण अभ्यास झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मध्ये, त्यांच्या मनामध्ये अभ्यासाबद्दलची एक आवड निर्माण होते, आणि आपल्याला ह्या सर्व गोष्टी येतात याची खात्री पटते आणि परीक्षेला सामोरे गेल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो. आणि त्यांचे आत्मविश्वासाची लेवल, मर्यादा वाढते.
  11. परीक्षेचे वातावरण परिचित होते ;-
                  स्पर्धा परीक्षेला सामोरे गेल्यामुळे विद्यार्थ्यांना आपली शाळा सोडून बाहेरच्या शाळेमध्ये परीक्षेसाठी जाण्यासाठी जी मनामध्ये भीती असते ती निघून जाते. कारण या स्पर्धा परीक्षा विविध शाळांमध्ये मिळून एकाच ठिकाणी केंद्रावरती आयोजित केलेला असतात. आणि त्या ठिकाणी जाऊन परीक्षा देण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना आल्यामुळे त्यांना परीक्षा केंद्र, बाहेरचे पर्यवेक्षक, केंद्र संचालक, आपली शाळा सोडून विविध शाळेमधील विद्यार्थी मित्र, बैठक व्यवस्था, परीक्षेचे वातावरण इत्यादी सर्व बाबी अंगवळणी पडतात.
                त्यामुळे त्यांच्या मनामध्ये असणारे अनामिक भीती निघून जाते.
           या सर्व बाबीमुळे विद्यार्थी भविष्यामध्ये त्यांना सामोरे जावे लागणार या सर्व स्पर्धा परीक्षांना यशस्वीरित्या तोंड देऊ शकतात.
    किंबहुना त्याचीच पूर्वतयारी या सर्व स्पर्धा परीक्षा मधून होत असते.
                म्हणूनच शालेय स्तरावरील या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या भावी स्पर्धा परीक्षांच्या करिअरसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरत आहेत.
              म्हणून सर्व पालकांनी व सर्व विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये आवर्जून भाग घ्यायला हवा.
    तयारी शिष्यवृत्ती परीक्षेची
    Mission Scholarship Exam
    तर अशाप्रकारे विद्यार्थी मित्रांनो शालेय जीवनामधील विविध स्पर्धा परीक्षा या इयत्ता पाचवी स्कॉलरशिप व नवोदय परीक्षा त्याचप्रमाणे इयत्ता आठवी स्कॉलरशिप नवोदय परीक्षा आणि इयत्ता आठवी एन एम एम एस परीक्षा इत्यादी महत्त्वाच्या शिष्यवृत्ती परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रकारच्या परीक्षा आहेत.
    या सर्व परीक्षांच्या दृष्टीने उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वेळ वाया न घालवता आपण या सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी व्हावी म्हणून सर्व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणार आहोत.
    त्यासाठी आपण विद्यार्थ्यांना मनोरंजक पद्धतीने विविध बहुपर्यायी प्रश्नांचा सराव देऊन शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेणार आहोत. #तयारी शिष्यवृत्ती परीक्षेची
    त्यासाठी आपल्या शिवशाही या ब्लॉगला अवश्य भेट द्या. आणि नियमितपणे येणाऱ्या सराव प्रश्नपत्रिका सोडून आपले गुण तपासून घ्या.
    म्हणजे आपला त्यात दृष्टीने अभ्यास ही होईल आणि आत्मविश्वास ही वाढेल.
    चला तर विद्यार्थी मित्रांनो आपणा सर्वांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी, शिष्यवृत्ती परीक्षा तयारी करण्यासाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.
तयारी शिष्यवृत्ती परीक्षेची
#तयारी शिष्यवृत्ती परीक्षेची

1 thought on “#तयारी शिष्यवृत्ती परीक्षेची”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top