#नवोदय परीक्षा 2024 चा निकाल लागला.
सर्व पालकांना नमस्कार. यावर्षी घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय परीक्षेचा निकाल लागलेला आहे. तो पाहणसाठी आपण खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून आपण आपला निकाल पाहू शकता.
. @जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा बद्दल थोडक्यात माहिती पाहूयात@.
. जवाहर नवोदय विद्यालय ही इयत्ता पाचवी मध्ये सर्व माध्यमांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देता येणारी प्रवेश परीक्षा आहे. ही प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवी ला बसलेले सर्व विद्यार्थी देऊ शकतात. ही परीक्षा विविध माध्यमातून देता येते. आपल्याला परीक्षेसाठी हवे ते माध्यम आपण निवडू शकतो. हवेच माध्यमातून आपण ही परीक्षा देऊ शकतो. या परीक्षेला भाषा गणित आणि बुद्धिमत्ता हे तीन घटक अभ्यासासाठी असतात. या परीक्षेची काठीने पातळी खूप वरच्या स्तरावरील असते. परंतु इयत्ता तिसरी मध्ये असताना पासून जर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी लक्ष देऊन या परीक्षेसाठी तयारी जर करून घेतली तर नक्कीच आपले विद्यार्थी या परीक्षेला पात्र होऊ शकतात. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ही अशी परीक्षा आहे की जी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांना पुढील शिक्षणासाठी अतिशय उत्तम पर्याय उपलब्ध करून देणारी ही प्रवेश परीक्षा आहे. कारण की जवाहर नवोदय विद्यालय ही प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्यामध्ये ठराविक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक जवाहर नवोदय विद्यालय असते. आणि या विद्यालयामध्ये प्रवेश देण्यासाठी ही प्रवेश परीक्षा घेतलेली असते. या प्रवेश परीक्षेमध्ये ग्रामीण भागातील मुलांना प्रवेश परीक्षेच्या मार्फत पुढील सहावीपासूनचे बारावीपर्यंत शिक्षण उत्तम दर्जाचे निवासासह आणि विनाशुल्क अशा प्रकारचे शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घेता यावे याकरिता ही परीक्षा घेतली जाते.
. या प्रवेश परीक्षेचे नियोजन आणि आयोजन हे जवाहर नवोदय विद्यालय समिती मार्फत केले जाते. जवाहर नवोदय विद्यालय समितीमार्फत जी नवोदय विद्यालय चालवली जातात त्या नवोदय विद्यालय यांचा मुख्य उद्देश हाच आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या प्रकारचे गुणवत्ता आहे अशा गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध व्हावे हा या पाठीमागचा शासनाचा पवित्र उद्देश आहे.
आणि म्हणूनच या प्रवेश परीक्षेमधून निवडण्यात येणाऱ्या मुलांमध्ये ग्रामीण भागातील मुलांना जास्त प्रमाणामध्ये प्राधान्य देण्यात आलेले असते. एकूण विद्यार्थी क्षमतेच्या 80% विद्यार्थी हे ग्रामीण भागातील निवडले जातात व 20 टक्के विद्यार्थी हे शहरी भागातील निवडले जातात.
म्हणूनच या परीक्षेमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी व शहरी भागातील शाळेमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांमध्ये प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी लागणारे गुणांमध्ये थोडाफार फरक पडतो. शहरी भागातील मुलांच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागातील मुले थोडे कमी गुण असले तरीही परीक्षेसाठी पात्र होऊ शकतात.
@नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये पात्र झाल्यानंतर पुढे काय@
A. इयत्ता पाचवीच्या वर्गामध्ये असताना दिलेल्या या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पात्र परीक्षेमध्ये विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याला जवाहर नवोदय विद्यालय मध्ये सहावी मध्ये प्रवेश दिला जातो.
B. इयत्ता सहावी मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी जवाहर नवोदय विद्यालय मार्फत जे कागदपत्र मागवले जातात त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच प्रवेश निश्चित केला जातो.
C. जर आपल्याला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या 80 टक्के जागेमधून जर प्रवेश मिळवायचा असेल तर आपल्या विद्यार्थ्यांच प्रवेश ग्रामीण भागातील शाळेमध्ये झालेला असावा किंवा त्याचे शिक्षण ग्रामीण भागातील शाळेमध्ये येता तिसरीपासून झालेले असणे आवश्यक आहे.
D. आपण निकाल बघितल्यानंतर जर आपले नाव निकालामध्ये आले तर आपला प्रवेश निश्चित झालेला आहे किंवा आपली जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झालेले आहे असा त्याचा अर्थ होतो.
E. निकाल पाहताना आवश्यक ती माहिती भरल्यानंतर जर आपला निकाल आणि आपले नाव दिसत नसेल तर आपला नंबर लागलेला नाही असा त्याचा अर्थ होतो.
F. प्रवेश परीक्षेमध्ये आपले सिलेक्शन झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या जिल्ह्यातील नवोदय विद्यालयामार्फत फोन कॉल येतो आणि आपल्याला प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेटण्यासाठी बोलावले जाते.
G. प्रत्यक्ष भेटीसाठी बोलावून आपल्याला प्रवेशासाठी आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे सांगितले जातात आणि ती कागदपत्रे घेऊन गेल्यानंतर आपला प्रवेश निश्चित केला जातो.
H. एकदा इयत्ता सहावी मध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित झाला की जवाहर नवोदय विद्यालयाच्या नियम व अटींचे पालन करून आपल्याला इयत्ता बारावी पर्यंत आपल्या पाल्याला मोफत व चांगल्या दर्जाचे उच्च दर्जाचे शिक्षण पुरवले जाते.
I. जवाहर नवोदय विद्यालय मधील अभ्यासक्रम हा सीबीएससी बोर्डाचा असतो.
J. जवाहर नवोदय विद्यालय मध्ये प्रवेश निश्चित झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी निवासाची देखील व्यवस्था असते.
K. प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना मुलींसाठी आणि मुलांसाठी स्वतंत्र वस्तीगृहाच व्यवस्था केलेली असते.
L. या ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच विविध क्रीडा स्पर्धा, विविध आमंत्रित पाहुण्यांचे लेक्चर्स, चर्चासत्र, त्याचप्रमाणे विविध कला कौशल्य इत्यादीचे बाबतीमध्ये अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण मिळते.
. #निकाल पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा#
Good
Thanks Sir
Helpfull
Thanks
Congratulations
Thanks Sir
Naigaon tq. Patoda dist. Beed
Thanks Sir
माहितीसाठी उपयुक्त साईट
Thanks Sir