अतिदुर्गम भागातील आंतरराष्ट्रीय शाळा, अनोखे शिक्षण

अतिदुर्गम भागातील आंतरराष्ट्रीय दर्जाची जिल्हा परिषदेची शाळा
अतिदुर्गम भागातील आंतरराष्ट्रीय दर्जाची जिल्हा परिषदेची शाळा विद्यार्थ्यांसोबत शाळेचे मुख्याध्यापक परतेकी सर

अतिदुर्गम भागातील आंतरराष्ट्रीय दर्जाची जिल्हा परिषदेची शाळा, तेथील अनोखे शिक्षण.

तुमच्या गावातील शाळा अशी होऊ शकत नाही का… अतिदुर्गम भागातील आंतरराष्ट्रीय शाळा.

अति दुर्गम भागातील आंतरराष्ट्रीय दर्जाची जिल्हा परिषदेची शाळा, देते अनोखे शिक्षण

#INTERNATIONAL LEVELS Z.P.SCHOOL

नमस्कार मंडळी. ही गोष्ट आहे एका जिल्हा परिषद शाळेची. आजकाल जिल्हा परिषदेच्या शाळा म्हटलं की बघण्याचा दृष्टिकोन बराचसा बदललेला दिसतो. जिल्हा परिषदेचे शाळांमधील शिक्षण हे खाजगी शाळेमधील शिक्षणापेक्षा व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील शिक्षणापेक्षा निकृष्ट दर्जाचे असते, असा सर्रास चुकीचा समज पालकांमध्ये पसरलेला आहे. आणि या समाजा मधूनच पालकांची प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक लूट खाजगी व इंग्रजी शाळांच्या माध्यमातून केली जाते की ज्यामध्ये पालक पिळून निघतात.

परंतु मित्रांनो आजच्या या शाळेबद्दल जर आपण हा संपूर्ण लेख वाचला तर नक्कीच जिल्हा परिषदेच्या शाळेबद्दल चा आपला बघण्याचा दृष्टिकोन 100% बदलेल व तुम्ही देखील तुमच्या गावातील शाळा अशा प्रकारची आदर्श शाळा करण्यासाठी नक्कीच प्रेरित व्हाल आणि तसे व्हावे हाच एकमेव उद्देश हा लेख आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आहे. लेख शेवटपर्यंत वाचा, सत्य परिस्थिती समजून घ्या आणि तुमच्याही गावातील शाळा अशा प्रकारची उत्तम व दर्जेदार होण्यासाठी योग्य ते सहकार्य प्रशासन, त्या शाळेतील मुख्याध्यापक , शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती या सर्वांशी विचार विनिमय करून निश्चितच तुमच्याही गावातील शाळा तुम्ही अशा प्रकारची उत्तम शाळा बनवून गावातच तुमच्या विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण देऊ शकता, की ज्यामुळे तुमचे होणारे आर्थिक नुकसान टळेल व गावातच शिक्षण मिळाल्यामुळे दूरच्या किंवा शहरातील शाळेमध्ये जाण्यासाठी वाहतुकी दरम्यान होणारी तुमच्या विद्यार्थ्यांची हे सांग व त्यांच्या बालपणीच आजकालच्या या घाई गडबडीच्या जीवनामध्ये वाहतुकी दरम्यान त्यांच्या जीवाला असणारा धोका देखील देऊ शकतो.

आणि म्हणून हा संपूर्ण लेख काळजीपूर्वक वाचा व विचार मंथन नक्की करा. चला तर जाणून घेऊयात या शाळेबद्दल.

#अतिदुर्गम भागातील आंतरराष्ट्रीय दर्जाची जिल्हा परिषदेची शाळा, अनोखे शिक्षण

मित्रांनो ही गोष्ट सांगत आहेत संगीता हटके ज्यांचं बालवयातच लग्न झाल होतं आणि त्या पालढोह या गावच्या रहिवासी आहेत. त्यांच्या बालपणीच्या काळामध्ये त्यांच्या गावामध् शाळा नसल्यामुळे त्यांची शिक्षणाची इच्छा अपुरी राहिली अशी खंत त्यांना वाटत आहे.

म्हणून त्या म्हणतात की,”गावात उच्च शिक्षण नसल्यामुळे मी चौथीपर्यंतच शिकले. पुढील शिक्षणासाठी एका मांडव्याला शिकायला गेले. तिथे चार किलोमीटर पायी चालत जावं लागत असल्यामुळे आई-वडिलांनी मला शाळेतून घरीच बसवले. सातवीच्या वर्षी तर प्रथम सत्राचे पेपर दिले आणि द्वितीय सत्राच्या पेपरच्या वेळेला तर माझं लग्न देखील करण्यात आलं”

गावात छान असल्यामुळे संगीता हटके यांचे शिक्षणाची इच्छा अपुरी राहिली
दुर्गम भागात राहत असल्यामुळे अपुऱ्या शिक्षणामुळे लवकरच लग्न.

अति दुर्गम भागातील आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा, अनोखे शिक्षण

गावात शाळा नसल्यामुळे त्यांना पुढील शिक्षण घेता आले नाही आले नव्हते. त्यामुळे जेव्हा घरचे त्यांच्या लग्नाच्या तयारीला लागले तेव्हा त्यांना घरच्यांना विरोध देखील करता आला नाही असं त्यांनी सांगितलं.

अशा प्रकारच्या ह्या फक्त संगीताच नाहीतर तेथील स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 2005 ते 2015 या कालावधीमध्ये तब्बल 36 मुलींचे बाल वयातच विवाह झाले.

परंतु अशी जरी तेव्हाची परिस्थिती असली तरीही आता याच गावांमधील परिस्थिती बदललेली आहे. याच अधुरशिक्षण राहिलेल्या संगीता यांची कोमल नावाची मुलगी बीएससी करते आणि त्यांची छोटी मुलगी कुमारी वैष्णवी ही बारावीला आहे.

आणि ही परिस्थिती फक्त संगीता यांच्या बाबतीतच नाही तर सध्या याच गावातील एकूण 15 मुली पदवीचे शिक्षण घेत आहेत. या सगळ्या मुलींना गावातच शिकता आलं कारण गावांमध्ये दरवर्षी एक एक करत आपकी पर्यंतचे वर्ग वाढवण्यात आले आणि ही शाळा या विद्यार्थ्यांसाठी वर्षाचे सुमारे 365 दिवस सुरू राहिली.

365 दिवस सुरू असणारी ही अतिदुर्गम भागातील शाळा

अतिदुर्गम भागातील आंतरराष्ट्रीय शाळा,

तर ही आहे मित्रांनो जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पालडोह की जी या गावातील विद्यार्थ्यांसाठी वर्षाचे सुमारे 365 दिवसही सुरूच असते. आणि इतके कार्य दिन असल्यामुळे शिक्षणा व्यतिरिक्त अनेक बऱ्याच गोष्टी विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिकता येतात आणि तुझा फायदाही विविध कौशल्य विकसित झाल्यामुळे त्यांना नोकरी मिळवताना होत आहे असं येथे शिकून गेलेले विद्यार्थी सुद्धा सांगतात.

याच शाळेमध्ये शिकलेली एक विद्यार्थिनी तिचं नाव आहे शिवकांता श्रीमंगले, ती असं सांगते की त्यांच्या सर त्यांना सर्व विद्यार्थ्यांना पहाटे चार वाजता दहाव्याला घेऊन जायचे आणि त्या ठिकाणी हे विद्यार्थी खो-खो गोळा फेक अशा खेळांचा देखील सराव करायचे. याचा फायदा तिला पोलीस भरतीमध्ये झाला. की याच वर्षी पोलीस भरतीची परीक्षा दिली. तिच्या शाळेतल्या या केलेल्या सरावामुळे शारीरिक चाचणीमध्ये तिला चांगले गुण घेता आले.

हीच शिवकांता सध्या बी ए सेकंड इयरला असून ती चंद्रपूर या शहरांमध्ये शिकत आहे. ती याच जिल्हा परिषद शाळेची 2018 च्या इयत्ता आठवीच्या पहिल्या बॅचची विद्यार्थिनी आहे

अतिदुर्गम भागातील आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा, अनोखे शिक्षण..

का बरे ही जिल्हा परिषदेची शाळा 365 दिवस सुरू ठेवण्यात आली असेल?

आणि 365 दिवस या शाळेत काय शिकवलं जात असेल बरे?

“इथला डोंगर सपाट करून विद्यार्थ्यांसाठी मैदान तयार करण्यात आलं”

पारडोह या गावची जिल्हा परिषद शाळा सुमारे 365 दिवस सुरूच ठेवण्याचे कल्पना या शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र परतेकी या सरांची आहे. हे सर या ठिकाणी 2006 मध्ये या शाळेमध्ये शिक्षण सेवक पदावरती जॉईन झाले होते.

अति दुर्गम भागातील आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा, अनोखे शिक्षण

त्यावेळी या शाळेमध्ये फक्त चौथीपर्यंत वर्ग होते आणि वर्ग खोल्यांची संख्या तर फक्त दोनच होती. बहुवर्ग अध्यापन पद्धती सारखे एका खोलीमध्ये दोन वर्ग चे विद्यार्थी बसवले जायचे. त्यावेळी ची शाळा कशी होती त्याबद्दल श्री परतेकी सर सांगतात की, शाळेच्या समोर खूप मोठा उदार होता आणि त्यावर मोठमोठे दगड होते. विद्यार्थी हे आपल्याच गावातील असल्यामुळे या उतारावरून चालायचे , धावायचे, पळायचे या सर्व गोष्टींची त्यांना सवय होती. परंतु शिक्षकांना मात्र शाळेत यायला अडचण व्हायची.

एवढंच नाही तर विद्यार्थ्यांना खेळायला साधं छोटसं मैदान सुद्धा या ठिकाणी नव्हतं. जेव्हा सरांनी 2009 स*** डोंगरा भाग खोदायला सुरुवात केली. इथले दगड काढून सपाट मैदान विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलं. सर एकटेच असल्यामुळे हे मैदान तयार करायला सुमारे सहा वर्षे लागली.

*कशी बरे सुरू झाली असेल ही 365 दिवसाची शाळा*

आता मैदान तयार झाल्यामुळे विद्यार्थी शाळेत खेळू शकतात त्यांना तिथे अभ्यास देखील करता येईल असं चांगलं आणि सपाट मैदान तयार झाले त्यावेळी शाळेची पटसंख्या होती 22 जी आता 163 वर पोहोचलेली आहे आणि दरवर्षी एक वर्ग वाढवत नेऊन आता शाळेत नववी पर्यंतचे वर्ग आहेत.

आता शेजारच्या गावांमधील जसे की एका मांडवा, सेनगाव, अर्जुनी, हिमायतनगर, पीटी गुडा, इत्यादी गावातले विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र स्कूल बसची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे पण हे सगळं कसं शक्य झालं बरं?

तर येथील मुख्याध्यापक सर सांगतात की त्यांच्या शाळेमध्ये जोपर्यंत शिकण्याची सोय होती. परंतु त्यानंतर मुलं तीन चार किलोमीटरवर असलेल्या टेकामंडळा शिकायला जायचे . डोंगर, दगडांचा रस्ता तुडवत त्यांना त्या गावी जावं लागायचं. मुख्याध्यापक सर सुद्धा टीका मांडव्याला राहायला होते.

जेव्हा सर रस्त्याने जायचे यायचे तेव्हा ही मुलं शाळेत न जाता असत्यात आणि काही विद्यार्थी तर प्रामाणिकपणे शाळेत जायचे. पण पायी चालत जायचं असल्यामुळे मुली मध्येच शाळा सोडून द्यायच्या. त्यामुळे शाळेचे शिक्षण संपलं की आई वडील त्या मुलींचा लग्न करून द्यायचे त्यामुळे बालविवाहाचे प्रमाण देखील याठिकाणी वाढलेलं होतं.

मुख्याध्यापक सर सांगतात की, जेव्हा ते त्या ठिकाणी शिक्षण सेवक म्हणून उर्दू झाले तेव्हा ज्या मुलींना पहिली दुसरी शकवलं आज त्यांचे मुलं मुख्याध्यापक सरांपेक्षा मोठे आहेत. मुख्याध्यापक सरांचा मुलगा तिसरीच शिकतो आणि या त्यांच्या हाताखाली शिकलेल्या विद्यार्थिनींचे मुलं सातवीत आहे त्यामुळे गावातच विद्यार्थ्यांसाठी वर्ग कसे वाढवता येईल यासाठी प्रयत्न करत होते.

अति दुर्गम भागातील आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा, अनोखे शिक्षण

इतक्यात शासन निर्णय काढण्यात आला की चौथीच्या वर्गाला पाचवीचा वर्ग जोडता येतो व सातवीच्या वर्गाला आठवी चा वर्ग जोडता येतो, तेव्हा राजेंद्र सरांनी 2015 ला चौथीला पाचवीचा वर्ग जोडला पण विद्यार्थी संख्या वाढत होती आणि शाळेत होते तर फक्त दोनच शिक्षक. इतक्या विद्यार्थ्यांना शिकवायचं कसं असा प्रश्न होता त्यामुळे राजेंद्र सरांनी या विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात वेळ द्यायला सुरुवात केली. उन्हाळ्यात या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम शक्य तितका पूर्ण करायचा असं या सरांनी ठरवलं. त्यानंतर सुट्टीच्या दिवशी विद्यार्थी आनंदाने शाळेत येत असल्याने सरांनी त्यांना शिकवत गेले. विद्यार्थी सणासुदीच्या दिवशीही शाळेत येऊ लागले असं करता करता नकळत राजेंद्र सरांची शाळा 365 दिवस सुरू झाली .

गावकऱ्यांनी स्वतःचा कापूस विकून शाळेसाठी जमीन खरेदी केली

अतिदुर्गम भागातील आंतरराष्ट्रीय शाळा,International School

गावानेही शाळेला आणि त्या शिक्षकांना एवढं सहकार्य केलं की अशाप्रकारे दरवर्षी एक एक वर्ग वाढत जात असल्यामुळे वर्ग संख्या कॉलेजच संख्या कमी पडत होती. म्हणून पाचवीपासून पुढील भागातल्या वद्यार्थ्यांना झाडाखाली शिकवलं जायचं. आणि अचानक पाऊस आला की सगळे विद्यार्थी दोन कॉलेजमध्ये एकत्र करून बसवले जायचे आणि पाऊस गेला की खाली प्लास्टिक टाकून या विद्यार्थ्यांना वेगळा करून शिकवलं जात होतं.

सरांनी त्यांच्या मुलांना शिकविण्यासाठी मेहनत घेत आहेत हे बघून गावातील लोक देखील पुढे येऊ लागले. या लोकांनी जंगलातून लाकड तोडून आणले आणि शाळेत एक मांडव तयार केला. नंतर मग या मांडवात पाचवी सहावीचे वर्ग सुरू करण्यात आले. त्यानंतर सरकारकडून शाळा बांधायला परवानगी मिळाली पण शाळेकडे बांधायला जागाच नव्हती.

जागा नसल्यामुळे शाळेजवळची एक शेत जमीन विकत घ्यायचं ठरलं. त्यासाठी या गावातील एकूण 80 घरांनी प्रत्येकी दोन हजार रुपये जमा केले. आणि ज्यांच्याकडे नगदी स्वरूपात पैसे नव्हते त्यांनी त्यांच्या घरातील शेतामध्ये पिकवलेला कापूस आणून दिला पण तरीही चाळीस हजार रुपये कमी पडत होते.

अति दुर्गम भागातील आंतरराष्ट्रीय शाळा,

तर त्यावर उपाय म्हणून गावकऱ्यांनी त्यांच्या गावांमधील मंदिरामध्ये बसवलेली दानपेटी की ज्यामध्ये ते दक्षिणा टाकायचे ते दानपेटी खुडली आणि त्यातील चाळीस हजार रुपये शाळेसाठी जमीन घ्यायला दिले. अशाप्रकारे लोकसभा निवडणूक गावात शाळेसाठी नवीन इमारत उभी राहिली आणि आता या इमारतीमध्ये इयत्ता नववी पर्यंत वर्ग भरवले जात आहेत आणि ते देखील सुमारे 365 दिवस चालणारे वर्ग…..!!!

अशा प्रकारच्या या जिल्हा परिषद शाळेमध्ये सुमारे 365 दिवस शिकवतात तरी काय?

या शाळेमध्ये दररोज पहाटे पळण्याचा आणि खेळण्याचा सराव घेतला जातो. पुण्याच्या सुट्ट्या लागण्याच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांकडून पुस्तक वापस घेतले जातात आणि ही पुस्तकं नवीन त्या वर्गामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना वाटप केले जातात. त्यांचे उन्हाळ्यामध्ये सुद्धा वर्ग भरतात आणि यामध्ये त्यांचा काही अभ्यासक्रम शिकून पूर्ण देखील होतो शहरातल्यामुळे ट्युशन लावून अभ्यासात सराव करतात परंतु या शाळेत मात्र उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना जेवढा होईल तेवढा अभ्यासक्रम शिकवला जातो.

हे झालं अभ्यासाच्या बाबतीमध्ये याशिवाय या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे जनरल नॉलेजचे वर्ग देखील होतात. त्यांना गृहपाठ दिला जातो त्यानंतर दुपारी दोन वाजता विद्यार्थ्यांना सुट्टी दिली जाते असे या शाळेत या ठिकाणचे विद्यार्थी देखील त्यांचं दैनंदिन काम करायचं वेळापत्रक सांगतात.

अतिदुर्गम भागातील आंतरराष्ट्रीय दर्जाची जिल्हा परिषदेची शाळा

सणासुदीच्या दिवशी सुद्धा शाळा सुरू असते. विद्यार्थी दररोज शाळेत येऊन सजेशन उत्सव साजरे करतात. होळीच्या दिवशी होळी खेळतात. पंचमीच्या दिवशी झोके खेळतात, गोकुळाष्टमीला दहीहंडी करतात, विद्यार्थ्यांसोबत गावकरी देखील सण आणि उत्सवामध्ये शाळेत सहभागी होतात. पोळ्याला मातीचे बैल बनवून शाळेत पोळा साजरा केला जातो.

दिवाळीच्या सणाला तर विद्यार्थी संपूर्ण शाळेत दिवे लावतात. सुंदर सुंदर रांगोळी काढतात आणि त्यामध्ये क्रमांक काढून त्यांना बक्षीस देखील दिले जातात. प्रत्येक सणाला आम्ही विद्यार्थ्यांना बक्षीस देतो असे येथील शिक्षक सांगतात.

पालडोहया गावाकडे घेऊन जाणारा रस्ता

अतिदुर्गम भागातील आंतरराष्ट्रीय शाळा, इंटरनॅशनल स्कूल,

अशा विविध उपक्रमाबरोबरच या शाळेमध्ये विद्यार्थी स्वतःची एक बचत बँकही चालू होतात, ज्यामध्ये सध्या सुमारे वीस हजार रुपये जमा आहे. विद्यार्थ्यां जवळ खाऊचे पैसे असले आणि त्यांना खर्च करायचे नसले की लगेच ते विद्यार्थी त्यांच्या जवळचे पैसे शाळेतील बचत बँकेमध्ये भरतात. अगदी भारतीय स्टेट बँके सरखा, खऱ्या खुऱ्या बँकेसारखाच या बँकेचा देखील व्यवहार चालतो.

विद्यार्थी या बँकेमध्ये पैसे भरतात त्यासाठी ते पावती भारतात आणि त्यांनी भरलेल्या पैशांची त्यांच्या पासबुक वर नोंद देखील केली जाते. त्यानंतर शाळेतल्या एका कपाटामध्ये हे पैसे ठेवले जातात. विद्यार्थ्यांना वही पेन शाळेचे साहित्य परीक्षेची शाळेची सहल अशा प्रकारच्या शालेय उपयोगी गोष्टींसाठी जेव्हा त्यांना पैशाची गरज पडते तेव्हा विद्यार्थी या बँकेत जाऊन स्लिप भरून पैसे काढून वापरतात.

या बचत बँकेच्या व्यवस्थापन कामकाज देखील शाळेतील विद्यार्थीच पाहतात.

अशा प्रकारची ही अत्यंत दुर्गा भागातील जिल्हा परिषदेची एक उत्कृष्ट, आदर्श शाळा आहे.

बघा तर, तुमची ही शाळा अशी आदर्श शाळा बनवता येते का?

विना UPSC परीक्षा IAS
इ.5 वी व इ.8 वी नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेचा पाया पक्का करणारी एकमेव परीक्षा.

2 thoughts on “अतिदुर्गम भागातील आंतरराष्ट्रीय शाळा, अनोखे शिक्षण”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top